मुक्ताईनगर दि.२८(वार्ताहर) भारतातील शूद्र ओबीसी पासून ते वर्णबाह्य जाती जमातींना तसेच महिलांना शिक्षणाचे स्वातंत्र्य मिळवून देणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या १३२ पुण्यतिथी निमित्त मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात म.फुले यांच्या पुतळ्याला पुष्प माला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, भारतातील जातीव्यवस्थेला आणि अमानवीय विषमतेला तुरुंग लावून कायमची मूठमाती देणारी विश्वश्रेष्ठ अशी,जगातील कोणत्याही क्रांती पेक्षा महान क्रांती घडवून आणणारे राष्ट्रपिता म.ज्योतिराव फुले यांना आज मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात स्थापित असलेल्या म.फुले छ.शाहू महाराज,आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यांना पुष्प माला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी सर्व मागासवर्गीय संवैधानिक संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष एड.मनोहर खैरनार,उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख पवन सोनवणे,भीमराव वाहुळे, राजेंद्र वानखेडे,धनराज सापधरे,राजू ढगे,रवींद्र पोहेकर,लीलाधर भालेराव, इत्यादी बहुजन समाज बांधव यावेळी उपस्थित होते.
