प्रति,
विकास महामंडळ बाबत...
आम्ही खालील विनंतीपूर्वक निवेदन सादर करतो की महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समाजाला मदत करण्यासाठी व समाजाच्या बेरोजगार तरुणांना व शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने मौलाना अबुल कलाम आझाद आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केलेली आहेत परंतु या मंडळामार्फत फक्त शैक्षणिक कर्ज योजना राबवली जात आहेत.शैक्षणिक कर्ज योजनेसोबतच बेरोजगार तरुणांना महामंडळामार्फत कमी व्याजदरात कर्ज प्रकरणे मंजूर करून त्यांना कर्ज वाटप करण्यात यावे. तसेच महाराष्ट्र शासनाने मौलाना अबुल कलाम आझाद आर्थिक विकास महामंडळाची भाग भांडवल 1000 कोटी पर्यंत करण्यात यावी. तसेच मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतंत्रपणे उघडण्यात यावे व कर्ज मंजूर प्रकरण हे मुंबई ऐवजी प्रत्येक जिल्ह्यातील कार्यालयातूनच करण्यात यावे वरील मागण्या तात्काळ माननीय मुख्यमंत्री महोदय व संबंधित मंत्री यांनी आगामी हिवाळी अधिवेशनापूर्वी चर्चासत्र बोलावून तत्काळ मार्गी लावावा अन्यथा हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ऑल इंडिया मजलीस ए ईत्तेहादुल मुस्लिमीन पक्षातर्फे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल पुढील सर्वस्वी जबाबदारी ही महाराष्ट्र शासनाची राहील करिता नोंद घ्यावी.
