आफताब पूनावाला यास २१ दिवसात फाशीची शिक्षा द्या--मुस्लिम शिष्टमंडळाची मागणी

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
*
 जळगाव शहरातील विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील लोकांनी एकत्रित येऊन मौलिक अधिकार मंच जळगाव च्या माध्यमाने महामहीम राष्ट्रपती व माननीय पंतप्रधान  तसेच माननीय राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांना आलेमा नाझिया शेख व श्रीमती शकीला तडवी यांच्या नेतृत्वाखाली अप्पर जिल्हा अधिकारी प्रवीण महाजन यांना निवेदन देण्यात आले असून त्यात श्रद्धा वालकर यांच्या मारेकरी आफताब पूनावाला यास २१ दिवसाच्या आत फाशीची शिक्षा द्या ही एकमेव मागणी करण्यात येऊन त्या मागणीच्या अनुसरून पालकांना सुद्धा आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी आता आपल्या पाल्याच्या कृती वर लक्ष द्यावे.

*आफताब - माध्यमे - संघटना व इस्लाम*

 आफताब हा खोजा,पारसी की मुस्लिम तो कोणताही समाजाचा असला तरी तो पापी व खुनी आहे. प्रिंट व सोशल मीडिया च्या माध्यमाने तो मुस्लिम आहे म्हणून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा काही लोक प्रयत्न करीत आहे. वास्तविक पाहता इस्लाम धर्माच्या पवित्र कुराणात सूर अल मायदा आयात क्रमांक ३२ व ३३ मध्ये स्पष्टपणे नमूद आहे की *ज्याने एखाद्या माणसाला अथवा पृथ्वीतलावर उपद्रव पसरविण्या व्यतिरिक्त अन्यकारणाने ठार केले तर त्याने जणू काही सर्व मानवांना ठार केले असे नमूदआहे* असून त्याची शिक्षा म्हणून *त्याला ठार मारा, अथवा सुळावर चढवा, अथवा परस्पर विरुद्ध दिशेने त्याचे हात पाय कापा* ही शिक्षा नमूद आहे व त्यापेक्षा  मरणोत्तर जीवनामध्ये त्याच्याकरिता याहून मोठी शिक्षा असल्याचे सुद्धा नमूद आहे.

*लिव्ह इन रिलेशनशिप - लव मॅरेज व धर्मांतरण*

 इस्लाम धर्मात एकांतात परकीय महलेशी बोलण्यास मनाई आहे तर तो पर स्री सोबत रिलेशनशिप मध्ये कसा राहू शकतो?  तसेच इस्लाम मध्ये लव मॅरेजला थारा नसून मॅरेज आफ्टर लव यास मान्यता आहे. लग्नानंतर तो फक्त आपल्या पत्नी सोबतच प्रेम करू शकतो. पुढे धर्मांतरणाला सुद्धा या कारणासाठी स्पष्टपणे मनाई आहे कारण इस्लाम धर्म हा नैतिकता  व मानवता यासाठी कोणी धर्मात आला तर त्यास मान्यता देतो परंतु प्रेम विवाह,लिव्ह अँड रिलेशनशिप यासाठी धर्मांतरास विरोध आहे. त्यास कोणताही धर्मगुरू इस्लाम धर्म मध्ये घेणार नाही.
*पालकांना आवाहन*
घटनेनिमित्त पालकांना सुद्धा आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी आपल्या मुला-मुलींना उच्च शिक्षण द्यावे परंतु त्यासोबत संस्कार व आपले धार्मिक शिक्षण सुद्धा द्यावे जेणेकरून ते आपल्या संस्कार व आपल्या धर्माच्या विरोधात जाणार नाही व अशा घटना घडणार नाही या घटनेतून आम्हा पालकांना हे दिसून येते की दोन्ही २६ व २८ वयोगटातले  उच्चशिक्षित होते परंतु संस्कार व धर्माचे ज्ञान नसल्यामुळे त्यांनी आपल्या पालकांच्या आदेशाला झुगारून आपले गाव सोडून इतरत्र एकटे लग्न न करता राहिल्याने असा प्रसंग निर्माण झालेला आहे त्यामुळे आपल्या पाल्यांना उच्च शिक्षणासोबत धार्मिक शिक्षण आवश्यक असल्याचे म्हटलेले आहे.

  *शिष्टमंडळात यांचा होता समावेश*

 मदरसा इस्लाहूननिसा च्या प्रमुख सौ.नाजीया शेख, तडवी समाजाच्या सौ शकिला बानो तडवी, सौ जरीना अब्दुल रऊफ, सौ शबाना मकसूद, सौ रुबीना अख्तर, मन्यार बीरादरीचे अध्यक्ष फारुक शेख, एम आय एम चे अध्यक्ष अहमद सर, अल्पसंख्यांक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष जहांगीर खान, शिवसेना महानगर अध्यक्ष जाकीर पठाण ,एनसीपी महानगर अध्यक्ष मजहर पठाण, काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अमजद पठाण,अमन फाउंडेशन चे शाहिद सैयद, शिकलगार बिरादरीचे अन्वर खान व मुजाहिद खान, जमियत उल्मा चे हाफिझ रहीम, शिवसेना सदस्य पप्पू भाऊ शेख, मरकज फाउंडेशनचे तनवीर शेख आदींचा समावेश होता.
फोटो कॅप्शन
१) अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांना निवेदन देताना व सौ नाझिया शेख सह शिष्ट मंडळ दिसत आहे
२) दिल्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात विविध माध्यमांना आपले मनोगत व्यक्त करताना फारुक शेख नाझिया शेख, शकीला बानो तडवी व अमजद पठाण आधी दिसत आहे
३) फळाचे सामूहिक छायाचित्र

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)