चिखली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रत्येक गावातील प्रत्येक घरात नळाचे शुद्ध पाणी देण्यास केंद्र व राज्य सरकार कटिबद्ध आहे. या पृष्ठभूमीवर मतदारसंघातील प्रत्येक गाव पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करायचे असून 'हर घर नल, हर नल जल' हे उद्दिष्ट गाठणार असल्याचे प्रतिपादन आमदार श्वेता महाले यांनी मतदारसंघातील विविध ठिकाणच्या जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर पाणीपुरवठा योजना आणि रस्ता कामाच्या भूमिपूजन प्रसंगी केले.
जलजीवन मिशन अंतर्गत मतदारसंघातील १० कोटी ११ लक्ष रुपयांच्या पाणीपुरवठा योजना व रस्ता कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार श्वेता महाले यांच्या हस्ते २ नोव्हेंबर रोजी पार पडला. यामध्ये १ कोटी १३ लक्ष ५१ हजार रुपयांचा सिंदखेड मातला पाणीपुरवठा योजना, २.५ कोटी रुपयांचा पारध - धामणगाव घाड- भडगाव- साकेगाव- चिखली रस्त्याची सुधारणा करणे, १ कोटी ४८ लक्ष ६६ हजार रुपयांचा मातला पाणीपुरवठा योजना आदी कामांचा समावेश आहे. या कामांच्या भूमिपूजन प्रसंगी आ. श्वेताताई महाले पाटील भाजपचे देवीदास पाटील जाधव, शिवसेनेचे ओमसिंग राजपुत, प्रतापसिंग राजपुत, सुधाकर काळे, शिवाजीराव देशमुख, अॅड. दिलीप यंगड, संजय सदार, सुनील देशमुख, साहेबराव पाटील, पंजाबराव धनवे, योगेश राजपुत, संतोष काळे, संदीप उगले, राजेश्वर उबरहंडे, शंकर तरमळे, विलास अहेर, द्वारका भोसले, नितीन राजपूत उपस्थित होते.

