केंद्र शासनाने अचानक आपल्या पोर्टल द्वारे अल्पसंख्यांक स्कॉलरशिप नोटिफिकेशन जारी करून बंद केल्याने मुस्लिम समाजात व अल्पसंख्यांक समाजात खळबळ माजली असून जळगाव शहरातील अल्पसंख्यांक समाजातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन निवासी उप जिल्हाधिकारी जळगाव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याद्वारे महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्म, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अल्पसंख्यांक समाजाच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना एक निवेदन देऊन त्याद्वारे मागणी केली की केंद्र शासनाने घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा व माननीय पंतप्रधानांच्या आश्वासनानुसार *सबका साथ,सबका विकास, सबका विश्वास* या युक्ती अनुसार खरोखरच भारताचे पंतप्रधान व भारत सरकार हे कार्य करीत आहेत का ? अशी शंका समाजात निर्माण झाली आहे.
अल्पसंख्यांक समाज हा शिक्षणाच्या माध्यमाने आपली प्रगती करू शकला तर निश्चितच तो भारत देशाच्या विकासात सुद्धा सहभागी राहील त्यामुळे केंद्र शासनाने जारी केलेले नोटिफिकेशन त्वरित रद्द करावे अशी मागणी करण्यात आली.
*निवेदन देतांना यांची होती उपस्थिती*
या मागणीचे निवेदन कुल जमातीचे अध्यक्ष सय्यद चांद यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना देण्यात आले यावेळी जळगाव जिल्हा मनियार बीरादरीचे अध्यक्ष फारुक शेख,महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे सहसचिव बाबा देशमुख, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक पार्टीचे जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, काँग्रेस पक्षाचे महानगराध्यक्ष अमजद पठाण, एम आय एम पार्टीचे नगरसेवक प्रतिनिधी अक्रम देशमुख, माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष शेरा भाई, शिवसेना महानगर अध्यक्ष जाकिर पठाण व सिकलगर बिरादरीचे अध्यक्ष अन्वर खान यांची उपस्थिती होती.
*फोटो कॅप्शन.*
निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना निवेदन देताना बाबा देशमुख सोबत मजहर पठाण, अमजद पठाण, फारुख शेख, शेरा भाई, सय्यद चांद, अक्रम देशमुख व अनवर खान आदि दिसत आहे.
