मजरूह अकॅडमी चा महफिल ए मुशायरा यशस्वी**४ पुस्तक आवृत्ती चे प्रकाशन*

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
*

 जळगाव मेहरून येथील टिक्की हॉलमध्ये मजरूह अकॅडमी जळगाव तर्फे एका महफिल ए मुशायरा अर्थातच कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या संमेलनाचे अध्यक्षपदी जळगाव जिल्हा मुस्लिम मनीयार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख हे होते तर संमेलनाचे उद्घाटन मेमन बिरादरीचे अध्यक्ष कादर कच्ची यांच्या हस्ते शमा (दीप) प्रज्वलित करून करण्यात आले यावेळी विशेष उपस्थिती म्हणून बरहानपूरचे कय्युम राज व जमील अजगर यांची तरप्रमुख अतिथी म्हणून जळगावचे तन्वीर शेख, सलीम इनामदार, अक्रम देशमुख व अझीझ शिकलगर आदींची उपस्थिती होती.

 *१२ शायर (कवींनी) सादर केल्या आपल्या गझल - कविता*

 या छोटेखानी कार्यक्रमात बऱ्हाणपूर, मालेगाव, मुंबई, मारुळ सह जळगाव  येथील स्थानिक कवींनी सहभाग घेतला त्यात प्रामुख्याने
*रागिब ब्यावली,अल्लामा कय्युम राज, जमील अजगर, महबूब परवाज,अहेसान जामनेरी, जहिरोद्दिन जहीर, वकार सिद्दीकी, मुश्ताक सहील, शकील अंजुम, इमरान फारीस, साद जीलानी, सफी जलगावी, शुउर आसना, जमील अझगर  व डॉ शफीक नाझिम यांचा समावेश होता.*

*४ पुस्तक आवृत्ती प्रकाशन*
बऱ्हाणपूर येथील आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त शायर कवी जमील अजगर  यांच्या *पसेहुर्फ व लब्ज,लहू टपकता है और परवरदिगार बोलता है या तीन पुस्तका सह शऊर आसना यांच्या इंतेझार और कबतक* या पुस्तकांच्याआवृत्तीचे प्रकाशन अध्यक्ष फारुक शेख यांच्या हस्ते करण्यात आले.
*प्रास्ताविक- उद्घाटन -मार्गदर्शन - आभार*

 या कवी संमेलनाचे व पुस्तक प्रकाशन निमित्त आपले अध्यक्षीय भाषण करताना फारुक शेख यांनी कवींना दिल की बात व चालू असलेल्या घडामोडी व त्यावर काय करता येईल याबाबत आपल्या कवितांच्या माध्यमाने तरुणांना मार्गदर्शन करा असे  भावनिक आवाहन केले.
 उद्घाटनपर मार्गदर्शन करताना कादर कच्ची यांनी कवी हा समाजाचा मार्गदर्शक असतो त्याने आपल्या कवितेने ते कार्य करावे. प्रास्ताविक मजरुह अकॅडमीचे सचिव रशीद पिंजारी यांनी केले तर अकॅडमीचे अध्यक्ष डॉक्टर शफिक नाजिम यांनी अत्यंत वेगळ्या तऱ्हेने अध्यक्ष, उद्घाटक  व आलेल्या सर्व कवींचे त्यांनी सादर केलेल्या कवितेच्या ओळीने आभार मानले.
 मुशायरा यशस्वीतेसाठी मजरुह  अकॅडमीचे नियाजोद्दिन मलिक, कारी अब्दुल आदींनी विशेष परिश्रम घेतले.
फोटो.
१) दीप प्रज्वलन करून उद्घाटन करतांना कादर कच्ची,फारुक शेख,तन्वीर शेख व कय्यूम राज आदी दिसत आहे
२)पुस्तक प्रकाशन करतांना फारुक शेख सह डावी कडून 
नियाझअली, रशीद पिंजारी,  महेबुब परवाझ,डॉ शफीक,जमील अझगर,इमरान फारिस, कय्यूम राज, शूऊर आसना, रागीब ब्यावली, साद जिलानी, सफि जलगावी दिसत आहे

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)