इकरा ची आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी*

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
,*
 इकरा एज्युकेशन सोसायटी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एच.जे.थीम कला व विज्ञान महाविद्यालय मेहरूण जळगावच्या क्रीडा विभागाच्या कुस्तीपटूंनी आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली.  डी.एन. कॉलेज, फैजपूर येथे आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा पार पडल्या.  या स्पर्धांमध्ये रिझवान अहमदने 70 किलो, सय्यद शादाब अलीने 79 किलो आणि शेख फझलने 86 किलो गटात प्रथम स्थान  पटकावले.  या यशा बद्दल इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अब्दुल करीम सालार, चेरअमन डॉ.इकबाल शाह, इजाज अहमद अब्दुल गफ्फार मलिक, महाविद्यालयाचे प्राचार्य इब्राहिम पिंजारी  व  प्राध्यापक, कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.  खेळाडूंना महाविद्यालयाचे  क्रिडा संचालक डॉ.चांद खान सफदर खान यांनी मार्गदर्शन केले.  विभागीय कुस्ती स्पर्धा धुळे  जिल्ह्यातील दहीवेल  गावातील महाविद्यालयात होणार आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)