आज दि.3/१२/२२रोजी मलकापूर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्री. एस. ए. कुलकर्णी यांनी चेक अनादर प्रकरणात आरोपी नलिनी छगन दाभाडकर यांना दोष सिद्धी अंति शिक्षा सुनावली.

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
आज दि.3/१२/२२रोजी मलकापूर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्री. एस. ए. कुलकर्णी यांनी चेक अनादर प्रकरणात आरोपी नलिनी छगन दाभाडकर यांना दोष सिद्धी अंति शिक्षा सुनावली.
       हकीकत अशी  सदर प्रकरणातील फिर्यादी व्ही. आर.ट्रेडर्सचे मालक राजेश संजय भागवत हे मलकापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती चे परवानाधारक अडते असून आरोपी ही नलिनी छगन दाभाळकर  ही गुरुदत्त ट्रेडर्स ची मालक आहे. आरोपी ही कृषी उत्पन्न बाजार समितीची व्यापारी असून तिने फिर्यादीच्या अडत मधून दिनांक 3.5.2017 व 6.5.2017 रोजी उधारीवर माल खरेदी केला होता व त्याचे परतफेड पोटी मलकापूर अर्बन बँकेचे दोन चेक फिर्यादीस दिले होते.  ते दोन्ही चेक अनादरीत झाल्यामुळे फिर्यादीने आरोपीस त्याचे वकिलामार्फत नोटीस देऊन रुपये तीन लाख 18 हजार 366 रुपये 45 पैसे एवढ्या रकमेची मागणी नोटीस मिळाल्यापासून पंधरा दिवसाचे आत देण्याची मागणी केली होती सदर नोटीस मिळून सुद्धा आरोपीने फिर्यादीस चेकची रक्कम न दिल्यामुळे फिर्यादीने आरोपीविरुद्ध मलकापूर येथील न्यायालयात किरकोळ फौजदारी मुकादम नंबर 865 / 2017 हे प्रकरण कलम 138 नुसार न्यायालयात दाखल केले होते. त्यामध्ये दोन्ही पक्षाचे पुरावे होऊन फिर्यादीतर्फे करण्यात आलेला अॅड. जी. डी. पाटील मलकापुर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस दोषी ठरवून चेकच्या रकमेवर दरसाल दर शेकडा नऊ टक्के दराने व्याज देण्याची आदेशित करून आरोपीस चार लाख 68 हजार 794 रुपये 59 पैसे एवढा दंड ठोठाउन ती रक्कम नुकसान भरपाई म्हणून फिर्यादीस देण्याचे आरोपीस आदेशित केले आहे. सदर रक्कम न दिल्यास सहा महिन्याची कारावासाची शिक्षा आरोपीस सुनावली आहे फिर्यादीच्या तर्फे अॅड.जी. डी.पाटील यांनी काम पाहिले.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)