प्रतिनिधी जुबेर मनिहार भुसावळ
केंद्र सरकारने कुठलीही पूर्वपरवानगी न देता अल्पसंख्याक समाजाची शिष्यवृत्ती बंद केली. ही शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करावी या मागणीसाठी मुस्लीम मंचतर्फे बुधवारी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
केंद्र सरकारने अल्पसंख्याक समाजाची विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करताना कोणतीही पूर्वसूचना दिली नाही. अचानक पोर्टलद्वारे ही शिष्यवृत्ती बंद करण्याची घोषणा करण्यात आली. यामुळे समाजात खळबळ उडाली. यानंतर शहर व परिसरातील अल्पसंख्याक समाजातील सामाजिक, राजकीय,
भुसावळयेथे प्रांताधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देतांना मुस्लीम मंचचे पदाधिकारी. त्यावर साबीर शेख यांची स्वाक्षरी आहे.
सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी शिष्यवृत्ती सुरू करावी यासाठी बुधवारी प्रांतांना निवेदन दिले. त्यात केंद्र सरकारने जारी केलेले नोटीफिकेशन तत्काळ मागे •घ्यावे. शिष्यवृत्तीअभावी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचणी येतील, अशी मागणी केली आहे. निवेदनावर मुस्लीम मंचचे अध्यक्ष साबीर शेख यांची स्वाक्षरी आहे.
