आयोजित करण्यात आले होते सदर मीटिंगमध्ये न्यायाधीश श्री कुलकर्णी साहेब जे एम एफ सी कोर्ट पहिले, श्री अहिर साहेब जे एम एफ सी कोर्ट दुसरे, सरकारी अभियोक्ता श्री वाकोडे साहेब, ऍडव्होकेट श्री जी डी पाटील, पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत पो ठाणे मलकापूर शहर, पोलीस निरीक्षक एफ सी मिर्झा पोस्ट मलकापूर ग्रामीण, पोलीस निरीक्षक आनंद महाजन पोस्ट एमआयडीसी मलकापूर असे हजर होते.
शासकीय सरकारी अभियोकत्ता जी डी पाटील यांनी संविधानांतर्गत आरोपीचे अधिकार या विषयावर सविस्तर असे मार्गदर्शन केले व शासकीय अभियोकता वाकोडे यांनी रिमांड वर्क अँड प्रोसिजर या विषयावर मार्गदर्शन केले तसेच श्री एस ए कुलकर्णी न्यायाधीश मलकापूर यांनी पोलिसांना कामकाज करताना येणाऱ्या कायदेशीर अडचणी विषयी माहिती देऊन पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रश्नांचे व शंकांचे निरासरण केले सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक सपोनी स्मिता म्हसाये यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक श्री कौस्तुभ चंद्रवर्धन इंगळे यांनी केले तसेच कार्यक्रमांमध्ये संविधानाचे उद्देशिकेचे वाचन डॉ. अमोल कुमार आनंद तायडे यांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सपोनी सुखदेव भोरखडे यांनी केले.
सदर कार्यक्रमास पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत पो ठाणे मलकापूर शहर, पोलीस निरीक्षक एफ सी मिर्झा पोस्ट मलकापूर ग्रामीण, पोलीस निरीक्षक आनंद महाजन पोस्ट एमआयडीसी मलकापूर व पोलीस स्टेशन चे सर्व अधिकारी व कर्मचारी असे उपस्थित होते.
