चाकूचा धाक दाखवून प्रवाशांना लुटणारी टोळी जेरबंद गुन्हे शाखा व अमडापुर पोलीसांची संयुक्त कारवाई..

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 


    बुलढाणा रात्रीचे सुमारास रस्त्यालगत उभ्या वाहनातील प्रवाशांना चाकुचा धाक दाखवून लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह अमडापुर पोलीसांनी जेरबंद केली आहे. यावेळी आरोपीच्या ताब्यातुन ३ लाख ६२ हजार रूपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. ही धडक कारवाई २२ डिसेंबर रोजी करण्यात आली. दरम्यान आरोपींना चिखली येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

खामगांव येथील प्रशांत अशोक वाकेकर व त्यांचे दोन मित्र खामगांव येथून औरंगाबाद येथे मन्त्रपुरम फायनान्स कंपनीच्या बैठकीसाठी १ डिसेंबर रोजी गेले होते. बैठक आटोपुन ते रात्रीचे सुमारास परत खामगाव कडे येत आसतांना अमडापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेठ गावासमोर त्यांच्या वाहनातील डिझेल संपल्यामुळे त्यांनी आपले वाहन रस्त्याच्या बाजूला उभे केले. त्यानंतर काही वेळातच खामगांवकडून एक स्विफ्ट डिझायर कार येवून त्यांच्या कारच्या बाजुला थांबली. यावेळी कारमधुन उतरलेल्या ४ जणांनी प्रशांत वाकेकर व त्यांच्या मित्रावर हल्ला केला. तसेच वाहनाचे काच फोडून त्यांना चाकुचा धाक दाखवित त्यांच्याकडील रोख अडीच हजार रुपये व एक बन प्लस मोबाईल घेवून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

प्रकरणी तक्रारीवरून अमडापुर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे चार पथक व अमडापुर पोलीसांचे एक स्थापन करण्यात आले होते. या पथकाने घटनास्थळास तात्काळ भेट देऊन घटनास्थळाकडे येण्या-जाण्याच्या रोडवरील सि.सी.टि.व्ही फुटेज हस्तगत केले. तसेच अभिलेखावरील जिल्ह्यातील व बाहेर जिल्ह्यातील निरिक्षक आरोपी तपासण्यात आले.

परंतु आरोपी हे नव्याने गुन्हेगारी क्षेत्रात पर्दापण करणारे असल्याने पोलीसांना कोणताही सुगावा लागला नाही. त्यानंतर पथकाने सिसिटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी करुन तसेच मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीसांनी जालना जिल्हयातील सतिष शंकर गायकवाड वय २८ रा. सवासणी, परशराम सिध्दु जाधव व २५ रा. सवासणी, वैभव गजानन गावंदे वय २१ रा. भराडखेडा, कृष्णा भगवान भोपडे वय २२ रा. सोनगिरी, गजानन रामप्रसाद प्रसाने वय २१ रा. डोलखेड यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांची सखोल विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

यावेळी त्यांच्या ताब्यातून तीन लाख रुपये किंमतीची कार, ३५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल, २५ हजार रुपये किंमतीचा चोरीचा मोबाईल व चोरीचे रोख अडीच हजार रुपये असा एकूण ३ लाख ६२ हजार ५०० रुपयाचा माल जप्त केला.

ही कारवाई स्थागुशाचे पोलीस निरिक्षक बळीराम गिते, सायबरचे पोलीस निरिक्षक शांतीकुमार पाटील, अमडापुरचे ठाणेदार नागेशकुमार चतरकर, स्थागुशाचे सहायक पोलीस अमित वानखडे, विलासकुमार सानप, मनिष गावंडे, पोलीस उपनिरिक्षक पांडुरंग शिंदे, श्रीकांत जिंदमवार, सुधाकर काळे, सुनिल खरात, पुरुषोत्तम आघाव, दिनेश बकाले, गणेश पाटील, अनंता फरतळे, वैभव मगर, सचिन जाधव, मधुकर रगड यांच्यासह अमडापुरचे पोलीस अंमलदार कमलाकर देशमुख, राजेश गवई, इरफान तडवी, सायबरचे राजू आढवे व कैलास ठोंबरे यांनी केली आहे. दरम्यान आरोपींना चिखली येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २५ डिसेंबर पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास अमडापुरचे ठाणेदार नागेशकुमार चतरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक पांडुरंग शिंदे हे करीत आहे. 

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)