जळगाव : पुष्पलता बेंडाळे चौकांत सुसाट ट्रकचालकाचे स्टेअरिंग वरील नियंत्रण सुटल्याने त्याने एकामागून एक वाहनाला धडक दिली. या अपघातात एक दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याला तातडीने जिल्हा रुग्णालय व तेथून खासगीत हलविण्यात आले. ही घटना शनिवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.
अजिंठा चौकाकडून शहरात येताना ट्रकवरील (क्र एमएच.१९ झेड. ७६० ) चालकाचा स्टेअरींगवरील ताबा सुटल्याने एकामागून एक वाहनांना धडकत ट्रक भारत पेट्रोपंपसमोरील देशी दारुच्या अड्ड्याजवळ थांबला. ट्रकवरील चालक पळून जात असताना त्याला जमावाने पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. दुचाकीस्वारास नागरिकांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथून खासगीत रवाना करण्यात आल्याची माहिती मिळाली.

.jpg)