अमृतसर नांदेड व मुंबई नागपूर या दोन गाड्यांना शेगावला थांबा

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 

  अमृतसर ते नांदेड गाडी क्रमांक ०४६३९ व ०४६४० ही गाडी २२ डिसेंबर ते २४ डिसेंबर प्रवाशांची गर्दी पाहता रेल्वे विभागाने प्रायोगिक तत्त्वावर चालवण्याचा निर्णय घेतला असून सदर गाडीला शेगाव येथे थांबा मिळाला आहे. गाडी क्रमांक ०४६४० अमृतसर ते नांदेड हे २२ व २३ डिसेंबरला अमृतसर वरून सकाळी ४:१५ ला सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ८:१५ ला शेगाव पोहोचेल व नांदेड करता रवना होईल.

     त्याच प्रकारे गाडी क्रमांक ०४६३९ नांदेड ते अमृतसर ही गाडी २३ व २४ डिसेंबरला रात्री २३:१० ला सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजता शेगाव वरून अमृतसरला रवाना होईल. सदर गाडी हिंगोली वाशिम, खंडवा, ग्वालीयर, दिल्ली मार्गे धावणार आहे त्याचप्रमाणे गाडी क्रमांक ०२१०३ ही गाडी २३ व ३० डिसेंबर आणि २२ व ६ जानेवारी २०२३ ला मुंबईवरून रात्री ८:१५ निघून दुसऱ्या दिवशी सकाळी ५:२० मिनिटांनी शेगावला पोहोचणार व नागपूरकडे रवाना होणार गाडी क्र. ०२१०४ २५ डिसेंम्बर व १,८ आणि २३ जानेवारीला दुपारी १:३० वाजता नागपूर वरून निघून त्याच दिवशी संध्याकाळी ५:२५ ला शेगावी पोहोचणार व मुंबईकडे रवाना होणार.. तरी सदर गाड्यांचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन प्रवासी संघटनांतर्फे करण्यात आले आहे. 

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)