नांदुरा तालुक्यातील खुमगांव येथे अवैध वरली मटका वदेशी दारूचा महापूर

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

    खुमगांव हे गाव नांदुरा शहरापासून नऊ ते दहा कि, मी, अंतरावर असून या गावात जेमतेम दोन हजार लोक संख्या असून या गावातील 50%परिवाराकडे शेती नसल्याने दुसऱ्याच्या शेतात मजुरी करुन आपला उदरनिर्वाह करावा लागतो मजूर बेरोजगार वर्गाला वेळेवर मजुरी मिळत नसल्याने पैशासाठी पर्यायाने वरली मटका लावून कमी पैस्यात जास्त पैसे मिळविण्याच्या नादात जवळचेही पैसे गमावून बसतो मग टेन्शन घेऊन दारु पिवून घरात महिलाबरोबर वाद करुन त्रास देतो अस्या या युवा वर्गाला दारू व वरलीच्या व्यसनापासून मुक्त करण्यासाठी खुमगाव गावातील वरली मटक्यासह देशी दारूचे अवैध धंदे बंद करण्यात यावे.
     अशी पोलीस प्रशासनास माहिती देऊनही पोलीस मात्र हप्ते घेऊन (अपना काम बनता भाडमे जाये जनता)  अशी भूमिका घेत अजगरासारखे सुस्त असल्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांना पोलीस प्रशासनाचा कोणत्याही प्रकारचा दबाव नसल्याने अवैध धंदेवाले गावात दादागिरीसह उद्दटअस्लील भाषेचा वापर करत खुलेआम देशी दारू विकत आहेत यामुळे गावातील वीस वर्षे खालील व बेरोजगार युवक वरली मटका आणी दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होत आहे याचा महिलांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे व काही महिलांचे संसार उध्वस्त होत आहे या दारू पिणाऱ्या शेतमजूर, बेरोजगार युवकाकडून कोणत्याही प्रकारचे वाईट कृत्य घडण्याची शक्यता नकारता येत नाही गावात अगोदर बरेच वाईट कृत्य घडलेले आहेत तरीही पोलीस कोणतीही कारवाही करताना दिसत नाही आहे यावर वरिष्ट अधिकारी यांनी लक्ष देऊन हे अवैध धंदे लवकरात लवकर कायमस्वरूपी बंद करावे अशी अपेक्षा गावातील महिला करत आहे

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)