गतकाळात महाराष्ट्र राज्य लोक आयुक्त तथा उप लोकआयुक्त आयुक्त अधिनियम १९७१ च्या कलम १२ च्या पोटकलम ५ अन्वये महामहिम राज्यपाल यांना सादर करण्यात आलेल्या विशेष अहवाल दि. ०४/११/२०१९ च्या अहवालावर दाखल झालेल्या वरील प्रमाणे दि. २८/१२/२०२१ रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सभागृहाच्या दोन्ही सभागृहाच्या पटलावर सामान्य प्रशासन विभाग यांनी सादर केलेल्या अहवालावर योग्य ती चर्चा येत्या महाराष्ट्र राज्य विधी मंडळाच्या आगामी अधिवेशनात दोन्ही सभागृहात सदर प्रकरणा विषयी महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल यांच्याकडून सादर झालेल्या लोक आयुक्त अधिनियमा अंतर्गत कलम १२ पोटकलम ७ अन्वये दोन्ही सभागृहात योग्य ती चर्चा होऊन सदर प्रकरणी योग्य न्याय मिळावा.
या हेतुने महाराष्ट्र राज्य लोक आयुक्त यांच्याकडे दि. २८/०१/२०१४ या तारखेला दाखल केलेल्या प्रकरणी संपूर्ण प्रक्रिया होवून सदर प्रकरण महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळात चर्चा व कार्यवाहीसाठी प्रलंबित आहेत.
सदर प्रकरणी योग्य ती दखल घेवून त्यावर येत्या अधिवेशनात कारवाई करण्यात यावी अन्यथा आगामी हिवाळी अधिवेशनात विधानसभेच्या सभागृहासमोर एकदिवसीय लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा सामाजीक कार्यकर्ते सुरेशदादा पेठकर, नांदुरा यांनी एका विनंतीपत्राद्वारे मा. पिठासीन अधिकारी तथा अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांचे कडे केलेली आहे.
सदर निवेदनाच्या प्रतिलीपी माहिती व उचित कार्यवाहीसाठी
१) मा. प्रधान सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबई-४०००३२./
२) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई-४०००३२./
३)विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र राज्य, विधानसभा सभागृह विधान मंडळ मुंबई-४०००३२. /
४) विरोधी पक्ष नेता, विधान परिषद सभागृह, विधान मंडळ मुंबई- ४०००३२./
५) मा. सचिव, संसदीय कार्य विभाग, मंत्रालय मुंबई- यांना पाठविण्यात आलेल्या आहेत.
