कोथळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे तालुका अध्यक्ष मुशिर खान यांच्या वतीने पक्ष प्रवेशाचा तसेच कोथळी शाखा

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
आज दिनांक ०२/१२/२०२२ रोजी कोथळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे तालुका अध्यक्ष मुशिर खान यांच्या वतीने पक्ष प्रवेशाचा तसेच कोथळी शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. मोबीन अहमद सर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक बुलडाणा हे होते तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून मा. यशवंतराव धाबे साहेब ता. अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोताळा हे होते. सदर कार्यक्रमात कोथळी येथील युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मा.आ.डॉ. राजेंद्रजी शिंगणे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मा.मोबीन अहमद सर,
 मा.यशवंतराव धाबे साहेब, मा. मुशिर खान यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी प्रकाश नाईक जि. उपाध्यक्ष अपंग सेल, मोसिन शाह ता. अध्यक्ष रा.काॅ अपंग सेल, यासिन शाह, अनिल राऊत, इमरान शाह हारून शाह, शाहरुख खान सोहिल खान, शे कलीम शे बब्बु, ईस्राईल शाह, शे लतीफ शे रशिद, गुलाब शाह, आलम शाह, कलीम खान, प्रतिक तायडे, लाल खान, जमील शाह, फारुख खान, शे इकबाल, सय्यद साबीर, सै. युनुस, नसिम खान, इरफान शाह, अज़हर शाह यांच्यासह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..!

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)