धामणगाव बढे येथे जागतिक एड्स दिनानिमीत्त जनजागृती पर रॅली ...*धामणगांव बढे सादिक शेख ✍️---------------------------------------

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 आज रोजी आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय मोताळा , प्राथमिक आरोग्य केंद्र धामणगाव बढे आणि एम . ई . एस. कनिष्ट महाविदयालय धामणगाव बढे याच्या संयुक्त विदयमाने जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधुन धामणगाव बढे येथे जनजागृती पर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते . या रॅलीला वैदयकीय अधिकारी डॉ . अक्षय जाधव , ग्रामीण रुग्णालय मोताळाच्या वैदयकीय अधिक्षक डॉ . अर्चना  उंबरकर मॅडम एम . ई . एस कनिष्ट महाविदयालय धामणगाव बढेचे प्राचार्य एम.पी.शेले सर यांनी हिरवी झेंडी दाखवुन सुरुवात केली . या रॅलीमधे मुलांनी वचन पाळा , एड्स टाळा . संयम आणि सुरक्षा एड्स पासुन रक्षा इत्यादी प्रकारचे नारे देऊन एच.आय.व्ही . / एड्स विषयी जनजागृती करण्यात आली . या रॅलीनंतर एच . आय . व्ही . / एड्स विषयी आयसीटीसी समुपदेशक गजानन लहासे यांनी संपुर्ण मार्गदर्शन केले . त्यामधे त्यानी एच . आय . व्ही . / एड्स या आजाराचा उगम , त्याची कारणे व त्यावरील 
 प्रतिबंधात्मक उपाय , तसेच एच . आय . व्ही . / एड्स चा प्रसार रोखण्यासाठी युवकामधे जनजागृतीची गरज व या वर्षीचे घोषवाक्य Equalize आपली एकता , आपली समानता , एचआयव्हीसह जगणा - यांकरिता या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले . या रॅलीमधे ग्रामीण रुग्णालय मोताळाचे , प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशोक महाले , प्रा . आ . केंद्र धामणगाव बढेचे सुपरवायझर ढकचवळे सर , प्रशांत क्षीरसागर , शेख अजिज शेख आबीद , व एम . ई . एस कनिष्ट महाविदयालय धामणगाव बढेचे प्रा . जी . एस . रहाणे सर , प्रा.यु. टी . दैवे सर , प्रा . पी . एस . शहाने सर , प्रा . एस . एस . गोरे सर , प्रा . जी . बी . लामखेडे मॅडम , प्रा . एस . एस . गोरे मॅडम प्रा . पी . व्ही . मुकुंद मॅडम व तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र धामणगाव बढेचे आरोग्य सेविका , अंजना लहाने , चव्हाण मॅडम , गाढे मॅडम , किरण मॅडम तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र धामणगाव बढे अंर्तगत सर्व आशा स्वयंमसेविका व इतर सर्व कर्मचारी यांनी हया रॅलीसाठी मोलाचे सहकार्य केले . या रॅलीमधे एकुण ५०० विदयार्थी सहभागी झाले होते .

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)