जळगाव : मध्यरात्री राहत्या घरातून बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह गावातील ग्रामपंचायतीजवळ असलेल्या विहिरीत तरंगताना आढळून आला. ही घटना जळगाव तालुक्यातील मोहाडी गावात रविवारी दुपारी उघडकीस आली आहे. पूजा भीमराव पवार (१६, मोहाडी) असे मृत मुलीचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.शुक्रवारी मध्यरात्री कुटुंबीय नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात झोपलेले असताना पजा घराबाहेर निघाली होती.
पहाटे तिच्या वडिलांना जाग आली. मुलगी कुठे गेली याची शोधाशोध सुरू केली होती. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गावातील ग्रामपंचायतीजवळील विहिरीमध्ये पूजाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना ग्रामस्थांना दिसून आला. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल मोरे व कर्मचाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढला. सायंकाळी शवविच्छेदन करून मृतदेह आला.

.jpg)