अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करु नका* *बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन* *धामणगाव बढे सादिक शेख

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
-------------------------------------
  अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करण्याच्या नोटिशीनंतर मुस्लिमांसह अन्य अल्पसंख्याकांमध्ये नाराजी पसरली आहे.  30 डिसेंबर रोजी मुस्लीम समाजाच्या शिष्टमंडळाने बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले.  शहरातील अल्पसंख्याक समाजातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक लोकांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.  या भेटीत त्यांना राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि अल्पसंख्याक समाजाचे मंत्री यांच्या नावे निवेदन देण्यात आले.  शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय मागे घेण्याबाबत शिष्टमंडळाने चर्चा केली.  निवेदन सादर करणाऱ्यांमध्ये धामणगाव बढे ग्रा, प,चे
 सदस्य अ‍ॅड.वसीम कुरेशी ,मो,सोफियान,शेख अनिस,तनवीर खान,आबिद खान,जाकीर कुरेशी,शेख अनिस, शेख जहिर, शेख आजम, शेख जावेद,शेख रफिक शेख करीम, आदि उपस्तिथ होते,

 

  शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करून इयत्ता पहिली ते आठवीच्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अचानक बंद करण्याचा निर्णय रद्द करण्यासंदर्भात तहसीलची उत्पन्नाची अट रद्द करण्यात यावी.  अल्पसंख्याकांचा विशेषतः मुस्लिम विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आर्थिक सामाजिक विकास साधण्यासाठी मौलाना आझाद संशोधन प्रशिक्षण संस्था मराठी नावाची स्वायत्त संस्था निर्माण करण्याबाबत.  यासोबतच अल्पसंख्याक योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र उच्चस्तरीय अधिकारी नेमण्यात यावा.ऍड.  वसीम कुरेशी, ग्रा,प, सदस्य धामणगाव बढे

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)