दामिनी पथकाने केली ९६ जणांची चौकशीशहरातील विविध भागातून घेतले होते ताब्यात

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0


अकोला ■ महिलांविरुद्ध होणाऱ्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हा पोलिस दलाचे दामिनी पथक पुन्हा सक्रिय झाले आहे. सदर विविध महाविद्यालयांसह विद्यालय, खासगी शिकवणी वर्ग, आले. महिला आश्रम अशा १०३ ठिकाणी पेट्रोलिंग करण्यात पेट्रोलिंगदरम्यान सुमारे ९६ व्यक्तींची चौकशी करून त्यांना समज देऊन सोडण्यात आल्याची माहिती पोलिस विभागामार्फत देण्यात आली.

दामिनी पथकाच्या हेल्पलाईन क्रमांकावर आतापर्यंत २६ तक्रारी प्राप्त झाल्या असून, दामिनी पथकामार्फत त्यांचा निपटारा करण्यात आला आहे.

पीडित महिलांनी किंवा संकटात सापडलेल्या महिलांनी महिलांसाठी असलेल्या दामिनी पथकासाठी ७४४७४१००१५ या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आहे.

चौकट

दामिनी पथकातर्फे जनजागृती मोहीम जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे व अपर पोलिस अधीक्षक मोनिका राऊतयांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथक प्रमुख पोलिस निरीक्षक उज्ज्वला देवकर तसेच पोलिस शिपाई सोळंके, प्रीती मोहोड, रिना गावंडे,
शुभांगी घावट तसेच चालक नारायण पितळे यांनी १६ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत शहरात पेट्रोलिंग दरम्यान शहरातील विविध १२ ठिकाणी जनजागृती कार्यक्रम घेतले आहेत.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)