तालुक्यातील टुणकी ते सोनाळा रस्त्यावर तसेच जामोद ते टुणकी रस्त्यावर सुद्धा मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवताना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो त्यामुळे या रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरित बुजवा या मागणीसाठी शिवसेना किसान सेनेच्या वतीने 12 डिसेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले .
सदर दिलेल्या निवेदनात नमूद आहे की टुनकी ते सोनाळा या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे अपघात होत आहेत .त्यामुळे टुनकी ते सोनाळा रस्त्यावरील मोठमोठे खड्डे त्वरित बुजवण्यात येऊन नागरिकांचा त्रास दूर करावा अन्यथा शिवसेना जिल्हाप्रमुख वसंतरावजी भोजने यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनातून देण्यात आलेला आहे या निवेदनावर शिवसेना किसान सेना तालुकाप्रमुख अमोल भाऊ ठाकरे ,शुभम घाटे शहर प्रमुख, विजय मारोडे उप .ता .प्रमुख, कैलास कडाळे उप तालुका प्रमुख, प्रल्हाद भाऊ अस्वार जिल्हा उपप्रमुख वाहतूक सेना ,शिवाजी अढाव , धनंजय अवचार ,मुरली इंगळे, राहुल मेटांगे ,राजेश शेंडे, सुनील मुकुंद रवींद्र मारोडे , शेख अब्दुल शेख लुकमान, अमोल देशमुख शिवा इंगळे, नितीन भिसे, पुरुषोत्तम मारोडे , गजानन वानखडे,संदीप अवचार आदींच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावर आहेत निवेदन देताना शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो कॅप्शन
तहसीलदार यांना निवेदन देताना शिवसेना किसान सेनेचे अमोल ठाकरे व शिवसेना पदाधिकारी
