भुसावळ शहरातील फालक नगरात एका अपार्टमेंटमध्ये विजेचा शॉक लागून एका मजुराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. फालक नगरात आर. के. हाईट्स येथे पाच मजली इमारतीचे काम सुरू आहे. या इमारतीच्या छतावर वॉटरप्रूफिंगचे काम सुरू होते. साइटवर साहित्य वाहून नेण्यासाठी लिफ्ट ट्रॉलीवर मयत नरेंद्र वाडेकर नेत असताना नरेंद्र नानकराव वाडेकर (३५, रा. सरस्वती नगर) याला विजेचा शॉक लागला यात नरेंद्र हा बेशद्ध झाला.
त्या लागलीच खासगी दवाखान्यात आणण्यात आले. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.तो गेल्या महिन्यापासून वॉटरप्रूफिंगचे काम करीत होता. याबाबत श्यामराव जयराम पवार (यावल) यांनी दिलेल्या खबरीवरून बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेकॉ सुनील जोशी हे करीत आहेत.

