प्रतिनिधी
देवधाबा ता.मलकापूर येथील ग्रामपंचायत कार्यालय व प्राथमिक शाळेमध्ये श्री.संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम श्री.संत संताजी महाराज जगनाडे यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पन करून उपस्थितांनी अभिवादन केले. यावेळी कुंदन मंडवाले, ज्ञानेश्वर भोजने, निलेश सुरंगे, गोपाळ भिसे, संजय सुरंगे, मारुती भिसे, गजानन भिसे, विजय मंडवाले, मुकेश मंडवाले, विलास महाजन, संजय भलभले, मनोहर भगत, गोपाळ गुरचळ, इत्यादींसह गावातील समाजबांधव व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

