आमदार संजय कुटे यांच्यावर कारवाई साठी वंचित आक्रमक

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

धामणगांव बढे   सादिक शेख
    महापुरुषाच्या केलेल्या अवमानाबद्दल जळगांव जामोद मतदार संघाचे विद्यमान आमदार डॉ . संजय कुटे यांच्यावर कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी जिल्हा नेते प्रशांत वाघोदे यांच्या नेतृत्वात आज मंगळवार दिनांक 13 डिसेंबर 2022 रोजी वंचीत बहुजन आघाडी च्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कडे एका निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे . वंचीत बहुजन आघाडी च्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमुद आहे . की , गेल्या वर्षे भरापासून सातत्याने भाजपाचे मंत्री , नेते , आमदार यांच्याकडून महापुरुष यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने केल्या जात आहे . ही बाब अतिशय गंभीर असून निषेधार्य आहे . त्यांना सत्तेची नशा चढली असून ते जाणीवपूर्वक विधाने करीत असून त्याकरिता देशामध्ये व महाराष्ट्रामध्ये आर . एस . एस . व भाजपा सामाजिक वातावरण बिघडविण्याचे काम करीत असून जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम ह्या संघटना करीत आहे . त्या मग्रूर सत्ताधाऱ्यांना सत्तेची नशा चढलेली असून सत्तेचा फायदा घेवून व हुकुमशाही गाजवून राज्यात अराजकता निर्माण करणे , कायदा व सुव्यवस्था धो आणणे असे अनेक प्रकार सातत्याने घडत आहेत .
     अशातच बुलडाणा जिल्ह्यातील माजी मंत्री आणि विद्यमान जळगांव जामोद या मतदार संघाचे आमदार डॉ . संजय कुटे यांनी मागील आठवडयात दिनांक ६ डिसेंबर , २०२२ रोजी त्यांच्या वडिलांची पुण्यतिथी असतांना , त्याच दिवशी महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असतांना , त्यावेळी आमदार डॉ . संजय कुटे यांनी त्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या वडिलांच्या फोटोसोबत महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो बरोबरीत लावून संविधान निर्माते डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना एक प्रकारे अवमानीत करण्याचा प्रयत्न केला असून त्यामुळे आंबेडकरी अनुयायी यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत . त्यामुळे अशा कृत्याचा धिक्कार करणे आवश्यक आहे . त्यांचेवर कठोर कार्यवाही करण्यात यावी 
     या मागणीचे निवेदन तहसिलदार संग्रामपूर व ठाणेदार जळगांव जामोद यांना देण्यात आले होते . परंतू सदरच्या निवेदनावर कोणत्याच प्रकारची ठोस कार्यवाही झाली नाही . त्यामुळे वरील बाबींची गंभीर दखल घेवून सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर योग्य ती कायदेशिर कार्यवाही करण्यात यावी . डॉ . संजय कुटे , आमदार यांचे निवास स्थानावर दिनांक २३ डिसेंबर २०२२ रोजी वंचित बहुजन आघाडी बुलडाणा जिल्हा यांच्या माध्यमातून आक्रोश मोर्चा काढण्यात येईल . असा इशारा निवेदनाच्या अंती देण्यात आला आहे . निवेदनावर जिल्हा नेते प्रशांत वाघोदे , जिल्हा अध्यक्ष निलेश जाधव , बुलडाणा शहर अध्यक्ष मिलिंद वानखेडे , तालुका संघटक अरुण सरदार , शहर महासचिव दिलीप राजभोज , नितीन राऊत , राजू वानखेडे , नंदकिशोर माळी , अमोल गवई , जमील शाह , संदीप लहाने , अमोल राजमाने , भागवत दांडगे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)