धुळे : शेती आणि घराचे काम येत नाही, असे कारण पुढे करत विवाहितेला तिच्या सासरच्यांनी मारहाण केली. तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद मयत विवाहितेच्या आईने पोलिसात दाखल केली.
शिरपूर तालुक्यातील जुना बाबापाडा येथील किरणबाई सुरजा पावरा (वय ४०) या महिलेने पोलिसात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, तिची मुलगी आशाबाई सियाराम पावरा (२४) हिचे दोन वर्षांपूर्वी शिरपूर तालुक्यातील वकवाड येथील सियाराम पावरा याच्यासोबत विवाह झाला.
आशाबाईला शेतीचे व घराचे काम येत नाही म्हणून तिला पती, सासू व सासरा (सर्व रा. वकवाड, ता. शिरपूर) यांनी वेळोवेळी शिवीगाळ करत मारहाण केली. या मारहाणीला कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार नवऱ्यासह सासू आणि सासरा याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक संदीप पाटील घटनेचा तपास करीत आहेत.

.jpg)