नांदुरा - इलेक्ट्रीक पोलवरील अॅल्युमीनीयमच तार चोरणार्या आरोपीला नांदुरा पोलिसांनी अवघ्या १७ तासात अटक करीत त्याच्याकडून चोरीकरीता वापरण्यात आलेल्या वाहनासह ४ लाख ४८ हजायर ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, मागील अनेक महिन्यापासून पासून नांदुरा पोलिस स्टेशन हद्दीत व इतर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये महावितरणचे पोलवरील ईलेक्ट्रीक अॅल्युमीनीयम तार चोरीचे सत्र सुरु होते. याबाबत श्रीकांत अरुण सोयस्कार (वय ३२ वर्ष) सहायक अभियंता महावितरण नांदुरा ग्रामीण यांनी नांदुरा पोलीस स्टेशन नांदुरा येथे तक्रार दिली होती की, नांदुरा ते जळगांव जामोद रोडचे लगत येरळी शिवारातील ३३ केव्ही पोलवरील एकुण २७ गाल्यातील ४००० मीटर लांबीची अॅल्युमीनीयमची तार किंमती ९६,००० रूपयांची चोरी गेली आहे. या तक्रारी वरुन पोलीस स्टेशन नांदुरा येथे अपराध क्रमाक ६७५/२०२२ कलम १३६ भा.वि.का सहकलम ३७९, ३४ भा.द.वि. प्रमाणे २९ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करुन पोस्टेचे गुन्हे अन्वेषन पथकातील पोहेकॉ गजानन जायभाये यांचेकडे तपास देण्यात आला होता.
सदर गुन्हा दाखल झाल्यापासून १७ तासाचे आतमध्ये पोलीसांनी तपासचक्र फिरवूण योग्य खबरी मार्फत माहिती घेवून गुन्ह्यातील फरार आरोपी पैकी आरोपी मो.नकीम उजर अब्दुल हकीम (वय २२ वर्ष) रा. पातुर जि.अकोला यास चोरीची वाहतुकी करीता वापरलेले बुलेरो पिकअप वाहन श्प्-४८ उ-१२७१ सह पातुर येथून ताब्यात घेतले. त्याचा पोलीस कस्टडी रिमांड प्राप्त करुन नमुद आरोपीकडून गुन्हयात चोरी गेलेल्या अॅल्यूनीमयच्या तार पैकी २४५ किलो अॅल्यूमीनीयम तार जप्त करण्यात आली असुन गुन्हयात इतर आरोपीतांचे सुध्दा नांवे निष्पन्न करण्यात आली आहेत. लवकरच फरार आरोपीतांचा शोध घेवून अटकेची कारवाई करण्यात येणार आहे. आरोपींकडून अदयाप पावेतो एकुण ४ लाख ४८ हजार ५०० रूपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई सारंग आवाड पोलीस अधिक्षक बुलडाणा, अशोक थोरात अपर पोलीस अधिक्षक खामगांव, अभिनव त्यागी उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापुर यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार अनिल बेहेरानी पोलीस निरीक्षक पोस्टे नांदुरा यांचे सुचनेनुसार सपोनि प्रविण मानकर, सपोनि प्रफुल्ल गाडेकर, पोउपनि चंद्रकांत मोरे, सफौ अरुण खुटाफळे, पोहेकॉ गजानन जायभाये, पोकॉ विनायक मानकर, पोकॉ सलीम बरडे, पोकॉ कैलास सुरडकर, पोकॉ रवि झगरे, पोना पंकज डाबेराव यांच्या पथकाने पार पाडली आहे.
