*नांदुरा. शिवजी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक बनले ट्राफिक हवालदार* नांदुरा नगर परिषद व पोलीस प्रशासन .तहसीलदार यांना शिवाजी हायस्कूलचे
By -
दिसंबर 01, 2022
0
मुख्याध्यापक यांनी निवेदन देऊन सुद्धा शाळेतल्या मुलांचे जीवन धोक्यात येत आहे. नांदुरा रेल्वे स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत पी डब्ल्यू डी ने नलीचे खोदकाम करून रोडचे काम गेल्या सहा महिन्यापासून बंद पडले आहे .त्यामुळे शिवाजी हायस्कूल समोर खूप ट्राफिक होते व खूपगर्दी होते व शाळेतल्या मुलांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागते आणि त्याच रोडवरती अवैधरित्या वाहने रस्त्यात उभे असतात. आणि त्याच रोडवरती अवैधरित्या दुकाने सुद्धा बांधले आहेत त्यामुळे गर्दी खूप होते आणि तिथे एक्सीडेंट होण्याचे जास्त संभावना आहे. व पीडब्ल्यूडी ने रोडचे काम बंद केल्यामुळे शाळेतल्या मुलांच्या जेवणामध्ये धूळ माती जाते त्यामुळे शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक यांनी प्रशानाला 3 वेळेस निवेदन देऊन सुद्धा नगरपालिका व पोलीस प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे कारवाई केली नाही केला.जर एखाद्या मुलाचा बरं वाईट झालं तर याला जिम्मेदार राहणार कोण असा त्यांनी नगरपालिका पोलीस प्रशासन यांच्यावर आरोप केला आहे. राज्य प्रतिनिधी रतन डोंगरदिवे Ib 7 न्यूज नांदुरा.
