खामगाव : तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक पार पडली. आगामी काही दिवसांमध्ये पंचायत समिती व जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकांची तयारी नेत्यांनी सुरू केली असून, त्याकरिता नव्याने विजयी झालेल्या सरपंचांना आपल्या गोटात ओढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. आपण कुणाच्या गोटात जावे याचा पेच सध्या सरपंचांसमोर निर्माण झाला आहे.
थेट जनतेतून विजयी झाल्यामुळे सरपंचांचे वजन वाढले आहे. जिल्ह्यातील पंचायत समित्या व जिल्हा परिषदेची मुदत संपली आहे. कोरोनामुळे तसेच अन्य कारणांमुळे निवडणक पढे ढकलण्यात आली होती. आता लवकरच निवडणुका जाहीर होतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे नेते कामाला लागले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीतही जिल्हा परिषद व पंचायत समितीतील नेत्यांचा प्रभाव दिसून आला. पंचायत समिती व जिल्हा परिषदेची उमेदवारी मागण्याकरिता आपल्यासोबतच किती सरपंच आहे, हे दाखविण्याकरिता तालक्यात आता सरपंचांना आपल्या गोटात ओढण्याकरिता नेत्यांमध्ये ओढ लागली आहे. सरपंचांकडे मात्र कुणाकडे जावे, याचा पेच निर्माण झाला आहे. संपूर्ण गावाने मदत केल्याने आणि गावगाड्यातील पारंपरिक गटबाजीच्या भरवशाने झालेले बहुतांश सरपंच सध्या तरी असे राजकीय लेबल लावायला आणि जवळच्या माणसांची मने दुखवायला तयार नाहीत. आपल्या विजयात सर्वच पक्षांचे कार्यकर्ते होते आणि ग्रामपंचायत निवडणुका कोणत्याही पक्ष, चिन्हावर झाल्या नाहीत. ग्रामीण गावगाड्यात सर्वांनाच सोबत घेऊन चालावे लागते, असा साधा युक्तिवाद सरपंच मंडळी करीत आहेत. नेते मात्र आपल्या कार्यालयात सरपंचांना बोलावून त्यांच्यासोबत फोटो काढून ते आपल्या सोबतच असल्याचे सांगत आहेत...

.jpg)