खंडोबा मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 


देवधाबा हिंगणा काझी येथे आयोजित केलेल्या खंडोबा मंदिर जीर्णोद्धार व सभामंडपाचा वास्तू पूजन सोहळा रविवारी उत्साहात संपन्न झाला. हिंगनाकाझी येथील खंडोबा मंदिराच्या कलशासह, तसेच मंदिराला लागूनच सभामंडपाचे नव्याने बांधकाम करण्यात आले. त्या निमित्ताने जीर्णोद्धार व वास्तू पूजन सोहळा रविवारला भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी सकाळी खंडोबा मूर्तीची सजविलेल्या रथातून वाघे मंडळाच्या वाद्यवृंदासह वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. भाविकांनी खंडोबाच्या मूर्तीचे दर्शन घेत आपला श्रद्धाभाव खंडोबा चरणी अर्पण करीत सहभाग नोंदविला. यावेळी देवधावा, हिंगणा काझी, भालेगाव व पंचक्रोशीतील नागरिक सहभागी झाले. महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली. माजी आमदार चैनसुख संचेती, माजी सरपंच मधुकर फासे व हिंगनाकाझी वासीयांच्या लोकवर्गणीतून खंडोबा मंदिर व सभामंडपाची निर्मिती करण्यात आली. सरपंच, उपसरपंच, सदस्य, गावकरी व जय मल्हार युवक मंडळाने सहभाग नोंदवला.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)