रविवारी मुक्ताईनगरात राहुल अनविकर यांचा प्रबोधनाचा कार्यक्रमआतिक खान मुक्ताईनगर

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0


संविधान सन्मान दिवस आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त निमित्त रविवारी मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात राष्ट्रीय प्रबोधनकार राहूल अनविकर यांचा गीत गायनाचा कर्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.संध्याकाळी सहा वाजता मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आ. चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होईल.

या कार्यक्रमाचे आयोजन डॉ बाबासाहेब आंबेडकर अभिवादन समितीचे मुकेशचंद्र वानखेडे ( मुक्ताईनगर),निरंजन तायडे( रावेर),पंकज पांडव( कुऱ्हा काकोडा),मोहन बेलदार( अंतुर्ली),शांताराम कोळी, भगवान महाले( बोदवड)यांनी केले आहे.कार्यक्रमासाठी उपस्थिती देण्याचे आवाहन आ.चंद्रकांत पाटील आणि अभिवादन समितीने केले आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)