खामगाव येथील फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना लूटले

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 


 मिटींग आटोपून खामगावकडे परत येत असतांना कारचे डिझेल संपल्याने पेठनजीक रोडवर थांबलेल्या फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना चार ते पाच जणांनी मारहाण करुन लुटल्याची घटना का रात्री घडली. खामगाव येथील फायनान्स कंपनीत काम करणारे प्रशांत वाकेकर २५ रा. चांदमारी व शुभम गोलांडे २७ रा. शिवाजी नगर हे दोघे कार क्र. एमएच २८ - व्ही ८२७८ औरंगाबाद येथे मिटींगकरीता गेले होते. त्यांच्यासोबत चिखली येथील आणखी एक कर्मचारी गेला होता. हे तिघे काल रात्री मिटींग आटोपून खामगावकडे येत होते चिखली येथील कर्मचाऱ्याला

चिखलीत सोडून वाकेकर, गोलांडे व कारचालक विजय कळसकार हे येत होते. दरम्यान पेठनजीक त्यांच्या कारचे डिझेल संपले. यामुळे त्यांनी कारमालकाला फोन करून डिझेल घेवून बोलाविले होते. थंडी असल्याने ते तिघेही कारमध्येच बसले होते. तेव्हा एका कारमधून ४-५ जण आले व त्यांनी लाकडी दांड्याने व दगडाने कारच्या काचा फोडून प्रशांत वाकेकर, शुभम गोलांडे व विजय कळसकार यांना मारहाण केली. त्यांच्याजवळून मोबाईल व ५ हजार रुपये हिसकावून घेत ते भामटे पसार झाले. यात प्रशांत वाकेकर हा जखमी झालेला असून त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. बाबत पोस्टेला तक्रार देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)