जळगावच्या कामांसंदर्भात आज मंत्रालयात बैठक

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 


जळगाव

     जळगाव शहरातील पंतप्रधान आवास योजनेच्या अंमलबजावणी व आढावा घेण्यासाठी मंत्रालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ९ जानेवारी रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत रस्त्यांच्या कामावरही चर्चा होणार आहे. शासनाकडून देण्यात आलेला निधी त्यातून झालेली कामे व भविष्यातील विकासकामांसंदर्भात या बैठकीत नियोजन होणार असल्याचे सांगण्यात आले. महापालिकेची निवडणूक काही दिवसांतच होऊ घातली आहे. भाजप नगरसेवकांच्या वॉर्डात कामे झालेली आहे.

    नाहीत म्हणून प्रत्येक नगरसेवकाला किमान दोन कोटी रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी भाजप नगरसेवकांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. त्यावर महाजन यांनी शासनाकडून निधी देण्याचे आश्वासन देण्यासह कोणती कामे प्राधान्याने घेता येतील याबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार भाजपच्या ३० नगरसेवकांनी प्रस्ताव तयार करून तो मंत्रालयात सादरही केला आहे. याच विषयावर सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गिरीश महाजन यांच्या उपस्थित मंत्रालयात बैठक होणार

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)