वाकोडी ग्राम पंचायत सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा अशांतभाई वानखेडे यांच्या हस्ते सहृदय सत्कार

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
सत्तेचा उपयोग माणसं जोडण्यासाठी केला तर सहजासहजी पायउतार व्हावे लागत नाही - अशांतभाई वानखेडे.

मलकापूरः(६) येथून जवळच असलेल्या गोकुलधाम वाकोडी येथील संबोधी बुध्द विहारात सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.नुकत्याच पार पडलेल्या ग्राम पंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार "समतेचे निळे वादळ" या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशांतभाई वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.


सत्ता ही दोन दिवसांची असते.आपला कार्यकाल पूर्ण झाल्यावर आपल्याला पुन्हा सर्वसामान्य माणसामधे परत यावे लागेल याचे भान ठेवून वागणे महत्त्वाचे असते.सत्तेवर असताना सत्तेचा वापर माणसं जोडण्यासाठी जे लोकप्रतिनिधी करतात ते सहजासहजी सत्तेच्या खुर्चीतून पायउतार होत नसतात म्हणून नव्याने जनतेमधून निवडून आलेल्या सरपंच,उपसरपंच आणि सदस्यांनी कायम लोकाभिमुख कार्य करावे व आपल्या गावाचा रचणात्मक विकास घडवून जनतेला नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात !अशी माफक अपेक्षा अशांतभाई वानखेडे यांनी यावेळी शुभेच्छापर बोलताना व्यक्त केली.




सदर प्रसंगी जनतेमधून निवडून आलेले सरपंच श्री शुभम काजळे, शैलेंद्रसिंह राजपुत उपसरपंच. अरुणसिंह राजपुत सदस्य,सौ. आशाबाई गुलाबराव पाटील सदस्या श्रीमती गीता शेगोकार,सौ.रुपाली गजानन खर्चे,सौ.अलका झनके,सौ,कविता वले,सौ.संगिता ढाले,सौ.संगिता इंगळे,सौ.ललिता रायबोले,सौ.विमल रोकडे,सौ,अलका हेलोडे,सौ.निशा मनवर,सौ,पुष्पा बिर्हाडे,सौ.संगिता रघुनाथ जाधव,अशोकसिंह दलबारासिंह राजपुत,कडू तायडे,संजय काजळे माजी सभापती,डॉ.एस.वाय.ढाले,पी.सी.इंगळे,एन डी इंगळे,एस के वले,माजी पोहेकॉ रोकडे,शरद ठाकरे,संदिप वानखेडे,एम डी इंगळे,धनंजय रायबोले,राजाराम उमाळे,ज्ञानदेव हेलोडे,एन एन मनवर,
शरद झनके प्रा.पी आर भोगे,राहुल क्षीरसागर,निरज पांडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. सुत्रसंचलन संदीप वानखेडे सचिव यांनी तर संबोधी बहुउद्देशिय बुध्दविहार संस्थेचे अध्यक्ष श्री जी. डी. झनके यांनी आभार प्रदर्शन केले.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)