मलकापूर- पत्रकार दिनाचे औचित्य साधून हिंदी-मराठी पत्रकार संघाच्या वतीने ६ जानेवारी रोजी स्थानिक कृ.उ.बा. समिती कार्यालयामध्ये पत्रकार बांधवांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.राजेश एकडे हे होते. तर तहसीलदार तथा न.प. प्रशासक राजेश सुरडकर, जेष्ठ पत्रकार हरीभाऊ गोसावी, हनुमान जगताप, हिंदी-मराठी पत्रकार संघाच्या प्रदेश अध्यक्ष धनश्रीताई काटीकर, शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सुरेश रोकडे, उल्हास शेकोकार यांची उपस्थिती होती.
यावेळी मलकापूर शहरासह परिसरातील वृत्तपत्र संपादक व पत्रकारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये  साप्ताहिक शब्द की गुंजचे संपादक शेख जमील शेख जानमोहम्मद यांचा सत्कार आ.राजेश एकडे, तहसीलदार राजेश सुरडकर व आदी मान्यवरांच्या हस्ते करून त्यांना गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला शहरातील व परिसरातील अनेक मान्यवरांसह पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)