धामणगाव बढे पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या नळकुंड उबाळखेड परिसरात दारूची भट्टी चालत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे धामणगाव बढे पोलिसांनी 13500 रुपयांच्या दारूसह एका आरोपीला अटक केली.ही कारवाई नुकतीच करण्यात आली.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी लहू साहेबराव शिकारे वय 22 वर्ष रा.उबाळखेड, तालुका मोताळा हा, धामणगाव बढे पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या रोहिणखेड बिटात नळकुंड उबाळखेड शिवारात गावठी दारू बनवत होता, त्याचवेळी पोलिसांनी पंचो समोर आरोपीस मालासह पकडले. प्लॅस्टिकच्या 20 कॅनमध्ये 300 लिटर मोह सडवा 7500 हजार रुपये व 4 प्लास्टिकचे कॅन, दारू 60 लिटर 6000 हजार रुपये, असा एकूण.13500 हजार रुपये चा मुद्दे माल जप्त करण्यात आला. हि कारवाई पोलीस अधिक्षक सारंग आवाड, अप्पर पोलीस अधिक्षक महामुनी, उपविभागय पोलिस अधिकारी सचिन कदम यांची सूचना व मार्गदर्शनांत करण्यात आली या कारवाई वेळी ठाणेदार सुखदेव भोरकडे पो.हे.कॉ.गजानन पाटील, पो.हे.कॉ.सुरेश सोनवणे, पो.हे.कॉ. चंदनसे मेजर, पो. का.सुरज रोकडे, पो.कॉ. संजय जाधव आदींनी ही कारवाई केली पो.हे.का.गजानन पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध कलम 65 क, फ, ड, नुसार कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला.
