मोताळा :- विवाह नोंदणीचे काही कागदपत्र देण्यासाठी चक्क 4 लाख व साखरेचं पोत मागणाऱ्या बोराखेडी येथील लाचखोर ग्रामविकास अधिकारी रामचंद्र पवार 1 लाख रुपयाची लाच घेताना अँटी करप्शन च्या जाळ्यात
सविस्तर वृत्त असे की बोराखेडीचे ग्रामविकास अधिकारी रामचंद्र पवार यांनी विवाह नोंदणीच्या वेळी जोडण्यात आलेली काही कागदपत्रे देण्यासाठी रामचंद्र पवार यांनी 4 लाख रुपये मागितले. एवढेच नव्हे तर साखरेचे पोतही लाचेच्या स्वरूपात मागितले. तक्रारदार मोताळा तालुक्यातील बोराखेडी येथील असून
तडजोडिअंती लाचेची रक्कम दोन लाख रुपयांवर आली. तक्रारदाराने सदर बाब अँटीकरप्शन ब्युरो मध्ये कळवली. मंगळवार रोजी रात्री आठ वाजेच्या दरम्यान बुलढाणा येथील चिखली रोडवर नागरे ठेकेदार यांच्या बंगल्यासमोर गाळा क्रमांक आठ मध्ये लाच देण्याची ठरले. लाचखोर आरोपी रामचंद्र पवार नियोजित वेळेवर पोहोचले. त्या ठिकाणी तक्रारदाराने एक लाख रुपयांची रक्कम पवार यांना सुपूर्द केली. दबा धरून बसलेल्या अँटी करप्शन च्या पथकाने दुसऱ्याच क्षणाला लाचखोर ग्राम विकास अधिकारी पवार याच्यावर झडप घातली. पवारला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनात तसेच अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत, अप्पर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे यांच्या सूचनेनुसार बुलढाणा उपाधीक्षक संजय चौधरी यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, एपीआय शाम भांगे, पो.हॅकॉ विलास साखरे, पो.ना. मोहम्मद रिजवान, प्रवीण बैरागी, जगदीश पवार, विनोद लोखंडे , सुनील राऊत, रवींद्र दळवी, म.पो.काॅ. स्वाती वाणी, ला.प्र.वि बुलढाणा यांनी यशस्वी केली. आरोपी ग्राम विकास अधिकारी रामचंद्र पवार याच्या विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
