शहापूरच्या शेतकऱ्याने चोरट्यांना दिले पकडून

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 


    जामनेर : शहापूर परिसरातील शेतकऱ्यांचे वीजपंप व इलेक्ट्रिक वायर चोरीचे प्रकार वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली असतानाच धरणाला लागून असलेल्या शेतातील वीज पंप व वायर चोरी करण्याच्या संशयावरून शनिवारी रात्री एका शेतकऱ्याने दोघा महिलेसह पाच जणांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

तक्रारदार सुभाष धना पाटील (शहापूर, ता. जामनेर) हे मुलगा सचिन याचे सोबत शेतात पिकांना पाणी देऊन परतत असतांना धरणाच्या पात्रालगत असलेल्या रमेश पंडित राजपूत यांचे शेताजवळ तीन अज्ञात व दोन महिला संशयास्पद उभे असलेले दिसले. याबाबत त्यांनी गावातील शेतकऱ्यांना व पोलिसांना माहिती दिली. संशयितांकडे स्टील कटर व गोणी आढळून आली, असे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी संशयावरून तीन पुरुषांसह दोघा महिलांविरुद्ध भादंवि कलम ३७९, ५११नुसार गुन्हा दाखल केला आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)