अमळनेर निंभोरा येथे घराची कडी उघडून पस्तीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच घरातील देव्हाऱ्यातील चांदीचे देव, लक्ष्मी, शिक्के, असा ऐवज चोरट्याने चोरून नेल्याची घटना २४ रोजी रात्री घडली.
निंभोरा येथील शेतकरी ज्ञानेश्वर आसाराम पाटील यांच्या घराच्या मागच्या दरवाजाची लोखंडी कड़ी चोरट्यांनी उघडून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाट उघडून आत ठेवलेल्या चावीने कपाटाचे लॉकर उघडले. त्यातून ३५ हजार रुपये किमतीचे दागिने आणि साहित्य चोरून नेले. घराच्या देव्हाऱ्यातील चांदीचे देव, लक्ष्मी, कपाटातील लॉकरमधील व पॅन्टच्या खिशामध्ये रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो. कॉ. सुनील आगवणे करीत आहेत.

.jpg)