शेगाव (गिरीश पळसोदकर)- येथील आनंद पालडीवाल हे आईच्या डोळ्याचे ऑपरेशन करण्यासाठी जालना येथे गेले

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
 होते. १५ व १६ जानेवारीच्या मध्यरात्री अज्ञात आरोपीने त्यांच्या घराचे कुलूप तोडून २५ लाख रूपये रोख, सोने व हिर्‍याचे १५०० ग्रॅम दागिने, चांदी भांडे असा एकूण ९२ लाख ५० हजार रूपयाचा मुद्देमाल चोरून नेला होता, अशी फिर्याद दिली होती.
मात्र प्रत्यक्षात ५० लाख १६ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरी गेल्याचे तपासात निष्पन्न झाले. यापैकी ४० लाख ३१ हजार ९८१ रूपयांचा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातून जप्त केल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत पोलिस अधिकार्‍यांनी दिली. या प्रकरणी पोलिस अधीक्षक सारंग आव्हाड, एएसपी अशोक थोरात, डीवायएसपी अमोल कोळी, यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे, शेगावचे ठाणेदार अनिल गोपाळ च्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज व  सायबर तांत्रिकच्या मदतीने गुन्हा उघडकीस आणला. मेहकर तालुक्यातील सोनाटी येथील वैभव नंदु मानवतकर यास नाशिक येथील अटक केल्यानंतर त्याने सदर गुन्हयाची कबुली दिली. त्यावरून पथकाने आरोपी मुंजा तुकाराम कहाते, प्रितम अमृतराव देशमुख रा. पित्री देशमुख ता.जि.परभणी या दोघांना अटक केली. त्यांनी माहिती दिल्यानंतर इतर आरोपी अजिंक्य डिगांबर जगताप रा. पुंगळा, ता.जिंतूर, नवनाथ विठ्ठल शिंदे रा.गंगाखेड जि.परभणी, कैलास लक्ष्मण सोनार,  रा.नाशिक मुयर राजू ढगे रा. निफाळ, सौरभ राजू ढगे रा.निफाळ, सुरजित अशोक साबळे रा.मालेगाव, प्रविण दिपक गांगुर्डे व सौ.पुजा प्रविण गागुर्डे रा.सातपुर नाशिक यांना अटक केली.
या सर्व आरोपींविरूध्द बुलढाणा जिल्ह्यासह यवतमाळ, परभरणी, नाशिक, औरंगाबाद, जालना, बीड, आदी जिल्ह्यामध्ये चोरी, जबरी चोरी, खून व घरफोडीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. फरार आरोपीचा शोध घेवून उर्वरीत मुद्देमालाचा शोध घेणे सुरू असल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)