इकरा थीम महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन*. जळगाव येथील ईकरा शिक्षण संस्था

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
 संचलित एच जे थीम कला व विज्ञान महाविद्यालय मेहरून जळगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष  ईकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अब्दुल करीम सालार  हे होते,  यावेळी प्रा. जफर शेख , अब्दुल रशीद शेख,   अजीज सालार, डॉ. जबिउल्ला शाह  आदी मान्यवरांची उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने करण्यात आली. त्यानंतर डॉ. अब्दुल करीम सालार  यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.   सकाळच्या सत्रात मुलींचा स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आला होता. प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती सफिया सालार, अमीना मॅडम, , अनिसा सालार, आदी उपस्थित होते. त्यामध्ये मुलींनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. त्यांनीही नात,  हजल, गजल ड्रामा, फॅन्सी ड्रेस,  कॉमेडी शो,  इत्यादींचे  सादरीकरण करून दाद मिळवली. त्यांना प्रा. आर.सी. देवकर, प्रा. डॉ. अंजली कुलकर्णी, प्रा. डॉ. आयेशा बासीत,  प्रा. डॉ. कहेकशा, प्रा डॉ शबाना खाटीक,  प्रा. डॉ.  अमरीन शेख, शाहिन फिरदोसी,  प्रा.नसरीन खान,  आदींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संमेलनात  विद्यार्थी  विद्यार्थिनी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.  या कार्यक्रमात नात,  हमद,  हजल,  गझल,  कव्वाली,  ड्रामा,  लोकनाट्य,  हजलिया मुशायरा, इत्यादी  विद्यार्थ्यांमध्ये असलेले कलागुण दिसून आले. विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेऊन आपले अंगी असलेले कलागुण सादर केले. यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. व त्यांनी केलेले कामाला प्रोत्साहन दिले.   डॉ. अब्दुल करीम सालार  यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की महाविद्यालयात असलेले व्यासपीठ विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे. याच  व्यासपीठातून अनेक व्यक्ती थोर होऊन गेलेत. काही प्राध्यापक झाले, काही  डॉक्टर झाले,  वकील झाले, संभाषण कला खूप महत्त्वाची असते.  महाविद्यालयाचे प्राचार्य इब्राहिम पिंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉक्टर राजू गावरे, प्रा. डॉ. युसूफ पटेल,  प्रा.डॉ. राजेश भामरे, प्रा. डॉ. चांदखान , प्रा. काझी        मुजम्मिल  नदवी,  डॉ. हाफीज शेख, प्रा.  डॉ.अमीन काझी,  प्रा. साजिद मालक, प्रा. डॉ.  मुस्तकीम बागवान,  प्रा डॉ सदाशिव डापके,  आदींनी खूप मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना खुप मोलाचे मार्गदर्शन केले.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)