मलकापूर मेडीकलच्या दुकानात औषधी भरण्यासाठी माहेरवरून १० लाख रूपये आणण्यासाठी तगादा लावणाऱ्या सासु, सारे, दिर, जेठाणी यांचेसह आदींवर विविध कलमान्वये अमरावती येथील सासरकडील मंडळीविरूध्द मलकापूर येथील माहेर असलेल्या विवाहितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती अशी की, मलकापूर माहेर असलेल्या पुजा वानखेडे ह्यांचा विवाह अमरावती येथील विवेक गणेश जमोदकर याचे सोबत २४/१२/२०२० रोजी मलकापूर येथे हिंदू रितीरिवाजने पार पडला. लग्न झालेवर त्या सासरी अमरावती येथे नांदावयास गेल्या. सुरुवातीचे काही दिवस चांगले वागविले. पुजा उच्च शिक्षित बी फार्म झालेली असल्याने तिने संसाराला हातभार लागावा म्हणून मेडिकलचे दुकान टाकले. या दुकानात औषधी भरणेसाठी माहेरवरून १० लाख घेऊन ये असा तगादा पती, सासू, सासरे दिर व जेठाणी यांनी लावला. तसेच दुकानाचे भाडे सुध्दा माहेरवरून घेऊन ये असा तगादा लावला.
माहेरची आर्थिक परिस्थिती चागली नाही असे पुजाने सांगितले असता सर्व मिळून तिला शिविगाळ व मारहाण करायचे. या दरम्यान त्यांना एक मुलगा झाला. परंतु मुलगा साडेसहा महिन्यातच जन्माला आला असल्याने त्याला डोळ्याने कमी दिसत आहे हे लक्षात आले म्हणून त्याला मेडिकल उपचार सुरू केले. त्या उपचाराचा खर्च सुध्दा तिच्या वडिलांनी केला व करत आहेत. त्याचप्रमाणे लग्नावेळी सोन्याचे दागिने २ लाख रुपये नगदी व महागड्या भेटवस्तू मुलाला दिल्या आहेत. तरी सुध्दा पैश्याची मागणी पती व इतर यांनी सुरूच ठेवली आहे. पैसे दिले नाही म्हणून मुलीला तीन महिन्यापूर्वी घरातून हाकलून दिले. तेव्हापासून पुजा ही माहेरी मलकापूर येथे राहत आहे.
याप्रकरणी पुजा हिने दिलेल्या तक्रारीवरून पती विवेक, सासरा गणेश रामभाऊ जमोदकर, सासू मंगला, जेठ श्रीकांत जमोदकर, जेठाणी मेघा जामोदकर व मुलाचा मामा बाळू गवळी याचे विरुध्द मलकापूर शहर पोलीस स्टेशनला भा.द.बी. चे कलम ४९८- अ, ३२३, ५०४, ५०६ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

.jpg)