मलकापूर मच्छी पकडण्यासाठी साठवलेल्या पाण्यामध्ये विद्युत प्रवाह सोडलेला असतांना त्याठिकाणी गेलेल्या १४ वर्षीय युवकाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना १९ जून रोजी मौजे बेलाड येथे घडली असूनसंबंधित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करून न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबतची माहिती अशी की, येथील जवळच अलेल्या मौजे बेलाड येथे गावाबाहेरच्या नदीजवळ असलेल्या विहिरीच्या बाजूला साठवलेल्या पाण्यामध्ये मच्छी पकडण्यासाठी त्या पाण्यात विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता. त्याठिकाणी गावातील प्रसार उर्फ या संजय गवळ (वय १४) हा युवक १९ जून रोजी ४.३० ते ५ वाजे दरम्यान त्या साठवलेल्या पाण्यात उतरला असता त्याला सोडण्यात आलेल्या विद्युत प्रवाहाचा जोरदार धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली मुलाच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून सदाशिव दहीभाते याचे विरुध्द कलम ३०४ अन्वये मलकापूर शहर पो.स्टे. ला गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. आज २० जून रोजी त्यास मलकापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

.jpg)