किसान काँग्रेस- एमपीसीसीच्या माध्यमातून शेतकर्यांच्या विविध प्रश्न सोडविण्यासाठी कार्य केले जाते. याच कार्यामध्ये आपणही सहभागी होत शेतकर्यांचे प्रश्न शासन दरबारी पोहचवून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच सोनियाजी गांधी, भाराकाँ अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, खा.राहुल गांधी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, सुखपालसिंह खैरा यांचे हात बळकट करण्याकरीता कार्य करावे. याकरीता जाबीर बशीर शेख यांची किसान काँग्रेस - एमपीसीसीच्या राज्य सचिवपदी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, सदस्य संसदीय बोर्ड एमपीसीसी पराग पश्ते यांनी एका नियुक्ती पत्राद्वारे नियुक्ती केली आहे.
जाबीर बशीर शेख यांच्या निवडीमुळे त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
