धामणगांव बढे सादिक शेख
ईद व एकादशी एकाच दिवशी येत असून काही अनुचित प्रकार घडू नये त्या अनुषंगाने धामणगांव बढे पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव। भोरकडे यांनी धामणगांव बढे ठाणया अंतर्गत येणा-रया पिंपळगाव देवी मद्धे विदर्भ खांदेश सीमेवर चेक पोस्ट उभारून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनाची कसून चौकशी करण्यात यात येत आहे . २ ९ जून रोजी बकरी ईद व आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे . या दोन्ही उत्सवादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये या उद्देशाने जिल्हा पोलीस अधीक्षक , सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भ व खांदेश यांच्या सीमेवर पिंपळगाव देवी येथे ठाणेदार सुखदेव भोरकडे यांनी रावटी टाकुन पोलीस चेक पोस्ट उभारून या ठिकाणावरून जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांची कडक चौकशी व तपासणी करण्यात येत आहे तपासणी बाहनधारकांनी दरम्यान पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन ठाणेदार सुखदेव भोरकडे यांनी केले आहे .
