बँकेतून शेतकऱ्याचे एक लाख रुपये लंपास

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0


महाराष्ट्र बँकेतून एका पाच ते सहा वर्षाच्या मुलाने शेतकऱ्याच्या एक लाख रूपयांची पिशवी लंपास केल्याची घटना १९ जून रोजी दुपारी घडली आहे. पोटळी येथील शेतकरी सुनील नामदेव लाहुडकार यांनी १९ जून रोजी स्टेट बँक नांदुरा येथून पीक कर्जाचे एक लाख रूपये काढले. पैसे पिशवीत टाकून नांदुरा शहरातीलच महाराष्ट्र बँके येथे गाडीचा हप्ता भरण्यासाठी ते गेले. तेथए स्लीप भरण्याकरिता त्यांनी पिशवी खाली ठेवली. त्याचा फायदा उचलत सहा वर्षांच्या मुलाने लंपास केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. घटनेची तक्रार लाहुडकार यांनी नांढरा पोलिसात दिली आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)