‘
धामणगाव बढे सादिक शेख
मोताळा तालुक्यातील सर्वांत मोठे गाव असलेल्या धामणगाव बढे येथे ' शासन आपल्या दारी ' उपक्रमाअंतर्गत शिबिर घेण्याची मागणी ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे . धामणगाव बढे हे तालुक्यातील सर्वांत मोठे गाव असून , ५६ लहान - मोठे • खेडी जोडलेली आहेत . विद्यार्थ्यांना लागणारे दाखले , श्रावणबाळ , रेशनकार्ड , मतदान कार्ड यासंदर्भातील कामांसाठी परिसरातील लोकांना मोताळा येथे चकरा फेऱ्या माराव्या लागतात . त्यामुळे , शिबिराचे आयोजन करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य ॲड . वसीम कुरेशी , सय्यद बिस्मिल्ला यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे .
