ठाणेदार रायटरची दुचाकी घरासमोरून लंपास

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0


सोनाळा येथे अज्ञात चोरट्याने कहर केला आहे . सोनाळा पोस्टेचे ठाणेदार रायटर पोकॉ कैलास सांगळे यांची घरासमोर उभी असलेली होन्डा शाईन ही दुचाकी चोरीला गेली आहे. भरवस्तीत १७ जुलैच्या मध्यरात्री ही दुचाकी चोरीला गेली आहे.. वृत्त लिहीपर्यंत याबाबत सोनाळा पोस्टेला तक्रार दाखल करण्यात आली नाही.

दरम्यान दुचाकीचा सर्वत्र शोधाशोध सुरु आहे. चोरीला गेलेल्या मोटरसायकलचा क्रमांक एमएच २५ एई ३३४१ असा आहे. बस थांब्या लगतच्या परिसरात ही चारी ची घटना घडली आहे . पोका सांगळे हे रात्री नाकाबंदीवर तैनात होते. उत्तररात्री घरी परतल्यावर गाडी उभी दिसून आली नाही. पोस्टेचे ठाणेदार एपीआय सागर भास्कर यांचे ते रायटर आहेत.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)