संग्रामपूर कृउबास निवडणुक : छानणीत ३ अर्ज बाद

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0


- संग्रामपूर

 संग्रामपूर अर्ज मागे घेण्याचे तारखे नंतरच संग्रामपूर कृउबासच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल छानणीच्या कार्यालयीन प्रक्रियेत ३ उमेदवारांचे नामांकन अर्ज बाद झाल्याने आता ११५ उमेदवारांचे नामांकन अर्ज कायम आहेत, २ ऑगस्टअर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून याच दिवशी रिंगणातील उमेदवारांचे चित्र स्पष्ट होऊन दुपारी चिन्ह वाटप होईल आता सध्या सुरू आहेत फक्त राजकीय तडजोडी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांींचा समावेश असून काल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वरवट बकाल येथे कार्यकर्त्यांची जंगी बैठक घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे रणसिंग फुंकत या निवडणूकसाठी सर्वच राजकीय पक्षांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.

कोरोना महामारीनंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांींमध्ये जोश व होश या निवडणुकीसाठी वाढल्याचे दिसून येते. २ ते १२ ऑगस्ट असे दहा दिवस प्रचारासाठी असल्याने प्रचाराची फुल टू धमाल होणार असल्याचे संकेत आहे त महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना होणार असल्याचे प्रथम दर्शनी सध्याचे चित्र दिसत आहे. कारण दोन महिन्यापूर्वी लगतच्या जळगाव जा. कृउबासच्या झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपाशी युती करून जी राजकीय तडजोड केली होती ती संग्रामपूर कृउबासच्या निवडणुकीत करू नये अशा प्रतिक्रिया निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उघडपणे व्यक्त होत आहेत. कारण त्या जळगाव जा. कृउबासच्या निवडणुकीत फक्त तीन संचालक काँग्रेसने मिळवले असले तरी त्यातही दोन संचालक काँग्रेस पक्षाचे नसून फक्त पुरस्कृत आहेत.

उरला फक्त काँग्रेसचा एक संचालक एवढीच कमाई काँग्रेसने त्या निवडणुकीतून केली ही हकीकत आहे. म्हणून यावेळी ताकही फुंकून पिण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाने आता या निवडणुकसाठी घ्यावी अशी ओरड अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते करत आहेत. अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी व शिवसेनेचे अनेक उमेदवार असले तरी या दोन्ही पक्षाला गटबाजीचे ग्रहण लागल्याने यांचे त काही च ताळमेळ नाही. शिवसेनेचे उघडपणे दोन गट आहेत तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात आहे  त्यामुळे युतीची बोलणी करावी कुणाशी याचे चिंतन राजकीय स्तरावर सुरू असल्याचे दिसते. २३ नोव्हेंबर २०२० रोजी या बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त होऊन तेव्हापासून या संस्थेवर प्रशासक राज आहे त्यामुळे या वेळची निवडणूक फार अटीतटीत होणार असल्याची चर्चा आहे गट तट व राजकीय पक्षाच्या सध्या पार पडत असलेल्या बैठका समा यामुळे निवडणूक मध्ये हलकीशी रंगत चढत आहे. काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांची सुद्धा बुधवारी निवडणूक संदर्भात मोठी बैठक पार पडल्याने या पक्षाचे कार्यकर्ते सुद्धाफुल तयारीत असल्याचे दिसते... 

बैठकीत महाविकास आघाडी करून समितीची निवडणूक लढा व तसे होत नसेल तर स्वबळावर निवडणूक लढा असा सूर आज सावता माळी मंगल कार्यालयात पार पडलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भरगच्च बैठकीत उमटल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.. बुधवारी ज्ञानदेव तायडे, नीता पुंडे यांचेसह तिघांचे अर्ज छानणीत बाद झाले. २ ऑगस्टपर्यंत नामांकन अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतरच निवडणुकी खरे चित्र स्पष्ट होईल. पण बाजार समितीची ही निवडणूक आगामी विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समितीचे निवडणुकीचे भविष्य वर्तवणारी ठरणार आहे एवढं निश्चित

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)