घुस्सर जवळ दोन ट्रकचा अपघात; २ ठार

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0


मलकापूर

 मलकापूर- बुलढाणा मार्गावर दाताळा नजीक असलेल्या घुस्सर फाट्यानजीक नारळाने भरलेला ट्रक व दुधाच्या ट्रकची जोरदार धडक झाली. ही धडक एवढी जोरदार होती की यामध्ये ट्रकला आग लागली. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी असल्याची घटना आज १४ ऑगस्ट रोजी ८ वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की दुधाचा ट्रक क्र. एम. एच ०४ जी. आर ९५४२ हे मलकापूर कडून बुलढाण्याच्या दिशेने जात होते. तर बुलढाणा कडून मलकापूरच्या दिशेने येत असलेले नारळाने भरलेला ट्रक क्रमांक आर. जे. १७ जी. ए. ५२९२ यांच्यामध्ये जोरदार धडक झाली. या धडकेने नारळाच्या भरलेल्या ट्रकला भीषण आग लागली. या आगीत ट्रक चालकाचा होरपळून मृत्यू झाला तर वाहक हा गंभीर जखमी असून त्यांना बुलढाणा येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर दुधाच्या ट्रकचा चालक गणेश ब्रिजलाल पाटील (वय ३०) रा. वरखेड बु. ता बोदवड याचा सुध्दा मृत्यू झाला आहे. 


एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)