चिखली (प्रतिनिधी)-
बुलढाण्यातील अपघातांची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाही. सकाळी ७ वाजे दरम्यान बुलढाणा-सवणा या एस टी बसला अपघात झाला असून एसटी बसचं स्टेअरिंग लॉक झाल्याने बस पलटी झाली. सदर बसमध्ये २५ प्रवासी होते. यात काही प्रवाशी जखमी झाल्याचे समजते.
सकाळी सातच्या सुमारास सवणा ते चिखली बसचा अपघात झाला. बसच्या स्टेअरिंगचा रॉड लॉक झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातग्रस्त बसमध्ये विद्यार्थी प्रवास करत असल्याने त्यांचे पालकही घाबरले आणि सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, या अपघातामध्ये चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. त्यासोबतच काही विद्यार्थीही जखमी झाले आहे. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत .सकाळी चिखली तालुक्यातील सवना येथून २५ प्रवासी घेऊन चिखलीकडे निघालेल्या बसचा स्टेरिंग लॉक झाल्याने एका वळणावर ही बस सरळ वीस फूट खोल खड्ड्यात पलटी झाली. या बसमध्ये बारा ते पंधरा विद्यार्थी देखील होते. बस स्टेरिंग लॉक झाल्याने चालकाचा बस वरील ताबा सुटल्याने ही बस खड्डयात कोसळली. नशीब बलवत्तर बसचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. राज्य परिवहन मंडळाच्या जुनाट व नादुरुस्त बसेसमुळे जिल्हघात सातत्याने अपघात होत असल्याचं समोर आलं आहे.

